Advertisements
Advertisements
प्रश्न
वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
उत्तर
पुस्तकाचे आत्मवृत्त
एकदा सकाळी उठण्यास फारच वेळ झाला. मन आळसावले होते. अभ्यासाच्या खोलीत जाऊन नुसताच टेबला जवळील खुर्चीवर बसलो होतो. टेबलावर पुस्तके अस्ताविस्तपणे पडली होती. मी मनामध्ये काही विचार करीत होतो. तेव्हाच कानांवर काही शब्द पडले अरे नुसताच काय बसतोस या पुस्तकांकडे बघता हल्ली बरीच पुस्तके तु हातात घेतोस आणि ठेवून देतोस. मलाही तसेच करतोस. आमचा तुला कंटाळा आला आहे काय? या शब्दांनी मी भानावंर आलो. पाहतो तर इतिहासचे पुस्तक माझ्याशी चक्क बोलत होते. ते सांगत होते कि माझा जन्म एका नामवंत इतिहास संशोधकांच्या घरी झाला. त्यामुळे माझी किंमत वाढलेली होती. त्यामुळे मला खूप मागणी होती. मी अनेकांच्या घरी होते. माझी ज्ञानी माणसांबरोबर मैत्री झाली. मी सर्वांना खूप आवडत होते. माझा या सर्व लोकांना खुप उपयोग होत होता. त्याच्या ज्ञानामध्ये खूप मोठी भर पडत होती. माझ्यामध्ये खूप संशोधनाची माहिती असलेले सर्वजण माझा वारंवार उपयोग करून घेत होते. इतर पुस्तकापेक्षा मला जरा जास्त मान मिळत होता.
आता पुस्तकांचे स्वरूप बदलत चालले आहे. नवीन डिजीटल तंत्रज्ञानामुळे संगणकावरच बरीच पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे पुस्तकांचा वापर कमी होत चालला आहे. हा वापर कमी झाल्यामुळे बरे वाटते कारण आम्हांला वाचण्यासाठी सारखे हातात घेवून घेवून आम्हाला फाडून टाकले जाते. आमच्याकडे कोणी फारसे लक्षपण देत नाही. त्यामुळे आम्हांला आता थोडा आराम मिळतो. याचा आनंद आहे अरे पण हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. कारण जर सर्व पुस्तके संगणकावर उपलब्ध झाली तर पुस्तकाला मागणी कमी होणार त्यांची छपाईकमी होणार. बाजारात पुस्तके मिळणार नाहीत. मग गरिबांनी काय करायचे? त्यांना संगणक घेणे परवडणार नाही आणि ते चांगल्या ज्ञानापासून वंचित राहतील यांची खंत वाटते. दारावरील टकटकीने मी भानावर आलो. दारात आई चहाचा कप घेऊन उभी होती. मी चहा घेऊन पुस्तकाचा विचार करत असता पुस्तकाचे म्हणणे बरोबर आहे. याचा आपण विचार केला पाहिजे असे वाटले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.