Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा:
आमदारसाहेब
उत्तर
आमदार, साहेब, आब, दार, दाब, सार, दाम, मदार, मर
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
कंठ दाटून येणे
खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.
खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.
तारांगणही स्पष्ट बिंबले
स्नाना जणुं हे मुनि अवतरले।
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
हरसाल -
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.
अनुस्वार वापरून लिहा.
जङ्गल - ______
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
खुदकन हसणे -
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
पाकिटात पैसे नव्हते.
खालील शब्दाचे वचन बदला.
वह्या -
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
मला कविता आठवली.
खालील शब्दाचे वचन बदला.
शिफारस -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
दूरवर ×
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
लवकर ×
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
चार - चारा
खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.
छत्तीसचा आकडा -
खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.
सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी ______ होत होता.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
सज्जन × ______
विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे |
असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.
उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......
रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______
खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.
वाक्ये | लिंग | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | |||
(अ) कावळा झाडावर राहतो. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(आ) रेश्माने पत्र वाचले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(इ) पोस्टमनने पत्र दिले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(ई) मायाने पाकीट उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(उ) मायाने दार उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
ते ______ सुंदर आहे.
खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.
उदा., गोरगरीब.
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. विरामचिन्ह व त्याचे नाव लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
पर-सवर्णाने लिहा.
मंदिर - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) हकालपट्टी करणे. | (अ) आश्चर्यचकित होणे. |
(२) स्तंभित होणे. | (आ) योग्य मार्गावर आणणे. |
(३) चूर होणे. | (इ) हाकलून देणे. |
(४) वठणीवर आणणे. | (ई) मग्न होणे. |
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.
शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
(१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
(२) | |||||
(३) | |||||
(४) | |||||
(५) |