हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

श्रीमती मीता अग्रवाल यांनी 100 रुपये बाजारभावाने 10,200 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यांपैकी 60 शेअर्स 125 रुपये बाजारभावाने विकले व उरलेले शेअर्स 90 रुपये बाजारभावाने - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

श्रीमती मीता अग्रवाल यांनी 100 रुपये बाजारभावाने 10,200 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यांपैकी 60 शेअर्स 125 रुपये बाजारभावाने विकले व उरलेले शेअर्स 90 रुपये बाजारभावाने विकले. प्रत्येक वेळी दलाली 0.1 % दराने दिली, तर या व्यवहारात त्यांना फायदा झाला की तोटा? किती रुपये?

योग

उत्तर

शेअर्स खरेदीबाबत:

एकूण गुंतवणूक = ₹ 10,200,

शेअर्सचा बाजारभाव = ₹ 100

∴ शेअर्सची संख्या = `"एकूण गुंतवणूक"/"बाजारभाव" = 10200/100` = ₹ 102

दलाली = एकूण गुंतवणुकीच्या 0.1 %

`= 0.1/100 xx 10,200` = ₹ 10.2

∴ 102 शेअर्सची खरेदी किंमत

= एकूण गुंतवणूक + दलाली

= 10,200 + 10.2

= ₹ 10,210.20

शेअर्सच्या विक्रीबाबत:

60 शेअर्स ₹ 125 बाजारभावाने विकले.

∴ 60 शेअर्सचा बाजारभाव = 125 × 60 = ₹ 7,500

दलाली = `0.1/100 xx 7,500` = ₹ 7.5

60 शेअर्सची विक्री किंमत = 7,500 – 7.5 = ₹ 7,492.50

आता, उरलेले शेअर्स = 102 – 60 = 42

42 शेअर्स 90 रुपये बाजारभावाने विकले.

∴ 42 शेअर्सचा बाजारभाव = 42 × 90 = ₹ 3,780

दलाली = `0.1/100 xx 3,780` = ₹ 3.78

42 शेअर्सची विक्री किंमत = 3,780 – 3.78 = ₹ 3776.22

∴ 102 शेअर्सची एकूण विक्री किंमत = 7492.5 + 3776.22 = ₹ 11268.72

येथे, शेअर्सची खरेदी किंमत < शेअर्सची विक्री किंमत

∴ या व्यवहारात नफा झाला आहे.

∴ नफा = शेअर्सची विक्री किंमत – शेअर्सची खरेदी किंमत

= 11268.72 - 10,210.20 = ₹ 1058.52

∴ या व्यवहारात श्रीमती मीता अग्रवाल यांना ₹ 1058.52 नफा झाला.

shaalaa.com
दलालीवर वस्तू व सेवा कर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B [पृष्ठ ११२]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 4 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B | Q 6 | पृष्ठ ११२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×