हिंदी

संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे.

विस्तार में उत्तर

उत्तर

  • शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते.

  • संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते.

  • संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो.

  • संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते.

  • संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संरक्षण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.

  • नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6.4: आपल्या संविधानाची ओळख - स्वाध्याय [पृष्ठ १७६]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 6.4 आपल्या संविधानाची ओळख
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ १७६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×