Advertisements
Advertisements
Question
संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे.
Solution
-
शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते.
-
संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते.
-
संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो.
-
संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते.
-
संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संरक्षण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.
-
नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते.