Advertisements
Advertisements
प्रश्न
स्पष्टीकरणासह लिहा.
काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात.
टिप्पणी लिखिए
उत्तर
एखाद्या विशिष्ट किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाते तेव्हा त्यांच्या मार्गात ठेवलेल्या फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी स्पष्ट खुणा दिसूत येतात. यावरून विद्युतक्षेत्राच्या प्रभावामुळे किरणोत्सारी प्रारणांचे तीन भाग पडतात. एक प्रारण ऋणप्रभारित पट्टीकडे थोडे विचलित झाले, या प्रारणास अल्फा किरणे तर दुसरे प्रारण धनप्रभारित पट्टीकडे जास्त प्रमाणात विचलित झाले, या प्रारणास बीटा किरणे व तिसऱ्या प्रारणांचे विद्युतक्षेत्रात विचलन झाले नाही, या प्रारणास गॅमा किरणे म्हणतात.
shaalaa.com
किरणोत्सारी पदार्थ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?