Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर
निसर्ग हा आपला गुरू आहे. या निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतो. निसर्ग ही एक बिनभिंतीची, उघडी शाळाच आहे. येथील लाखो घटक आपले गुरू आहेत. झाड आपल्याला परोपकारी वृत्ती, सहनशीलता, स्थितप्रज्ञता शिकवते, तर मुंगीत आपल्याला चिकाटी, जिद्द या गुणांचे दर्शन घडते. समुद्राची विशालता पाहिली की आपणही असे विशाल, व्यापक बनायला हवे हा विचार मनात येतो, तर फुलाकडून आपण टवटवीतपणा, चैतन्य, वातावरणात सुगंध भरण्याचा, आनंद निर्माण करण्याचा गुण शिकू शकतो. फुलपाखरूही आपल्या छोट्याशा जीवनकाळात जीवनातला रंगीबेरंगीपणा जपण्याची व आनंद लुटत जगण्याची शिकवण देते. मधमाशी, सुगरणपक्षी, गवत असा निसर्गातील प्रत्येक लहानातला लहान घटकही आपल्याला काहीतरी शिकवत असतो. अशाप्रकारे, निसर्गाच्या या भिंती नसलेल्या, मोकळ्या, प्रसन्न शाळेतील विविध गुरू त्यांच्या गुणांची शिकवण देऊन आपले जीवन समृद्ध करतात.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
सुंदर जग → | कोणाचे | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
अमूल्य शिकवण → | कोणाची | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
आकृती पूर्ण करा.
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -