Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
आधुनिक आवर्तसारणीची रचना
उत्तर
(१) आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. आधुनिक आवर्तसारणीमध्ये (1 ते 7) सात आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त म्हणतात. एकूण सात आवर्त आहेत. तसेच या सारणीतील (1 ते 18) अठरा उभे स्तंभ आहेत, त्यांना गण म्हणतात. एकूण गण 18 आहेत. आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात.
(२) प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. आवर्तसारणीच्या तळाशी सात ओळींव्यतिरिक्त आणखी दोन ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थॅनाइड श्रेणी आणि ऑक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. दोन श्रेणींसहित आवर्तसारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच 118 मूलद्रव्य साठी जागा आहेत. अगदी नजीकच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्तसारणी सर्व 118 मूलद्रव्यांची पूर्ण भरली आहे.
(३) संपूर्ण आवर्तसारणी मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे एस-खंड, पी-खंड, डी-खंड व एफ-खंड अशा चार खंडांमध्ये विभागली आहे. एस-खंडात गण 1 व 2 हे येतात; गण 13 ते गण 18 हे पी-खंडामध्ये येतात; गण 3 ते गण 12 हे डी-खंडात येतात; तर तळाच्या लॅन्थॅनाइड आणि ऑक्टिनाइड श्रेणी एफ-खंडात येतात. डी-खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. आवर्तसारणीच्या पी-खंडामध्ये एक नागमोडी रेषा दिसून येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक तीन प्रकार आधुनिक आवर्तसारणी मध्ये स्पष्टपणे दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या आजूबाजूला धातुसदृश मूलद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.
शास्त्रीय कारणे लिहा.
आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो.
खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?
गण १ व २ : एस खंड : : गण १३ व १८ : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.
आवर्तसारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आहेत.
व्याख्या लिहा.
आवर्त
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
- या मूलद्रव्याचा गण कोणता?
- हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?