Advertisements
Advertisements
प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)
आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
उत्तर
आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
वाहन अपघात | वाहतूक ठप्प होते. रस्त्यात गर्दी जमते. | कोणीतरी जखमी झालेले असते. मोठ्या प्रमाणावर अपघात असेल तर जास्त लोक एकाच वेळी जखमी होतात. वाहनांचे नुकसान होते. | प्रथम गर्दी हटवून पोलिसांना पाचारण करावे. जखमी व्यक्तीला प्रथमोपचार देऊन लगेच हॉस्पिटलमध्ये हलवावे. |
दरड कोसळणे | कोणत्या ठिकाणची दरड कोसळली आहे यावर लक्षणे आणि परिणाम अवलंबून आहेत. | जर डोंगरकड्याला घरे असतील, तर लोकांची घरे गाडली जातात. रस्त्याच्या कडेची दरड कोसळली तर वाहतूक बंद पडेल. | आपद्ग्रस्त लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून त्यांना वैद्यकीय मदत करणे. |
वणवा | सगळीकडे धूर साचतो. नैसर्गिक जंगलात वणवा पेटतो तेव्हा रानातले पशु-पक्षी सैरावैरा पळतात. आगीचे लोट नजरेस पडतात. | सारे काही जळून खाक होते. | अग्निशमन दलाला पाचारण करून जवळपासच्या वस्तीतील आग विझवायचा प्रयत्न केला पाहिजे. माणसे होरपळली असतील तर त्यांना वैदयकीय मदत दिली पाहिजे. |
चोरी | दाराचे कुलूप तोडलेले आढळते. घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. |
मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. शिवाय त्याचे मानसिक परिणाम देखील गंभीर होतात. शारीरिक इजा होण्याचा संभव असतो. |
पोलिसांना पाचारण करून चोरांचा माग काढला पाहिजे. |
दंगल | शहरात/गावात अस्वस्थता जाणवते. लोकांचे घोळके जमून उलटसुलट चर्चा करीत असतात. | सर्वांचेच नाहक आर्थिक नुकसान होते. माणसे मारली जातात. एकमेकांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. स्त्रिया आणि लहान मुलांवर अत्याचार होतात. | दंगल रोखणे हे छोट्या मुलांचे काम नाही. त्यासाठी पोलीसदल काही उपाय करू शकते. शांतता समिती स्थापन करून प्रत्येक वस्तीतील लोकांना त्यात सहभागी करून घेतले जाते. |
युद्ध | देशाच्या सीमाप्रांतांत गंभीर वातावरण, दोन्ही देशांच्या एकमेकांच्या कुरापती काढणे चालू होते. |
अतोनात हानी. सर्व प्रकारचे नुकसान,अनेक मृत्युमुखी, महागाईमध्ये वाढ, अन्नधान्याचा तुटवडा. संपूर्ण देशातच असुरक्षिततेची भावना. |
दोन शत्रूराष्ट्रांत शांतता करार आणि सामंजस्य निर्माण करणे. |
रोगाची साथ | आजारी लोकांच्या संख्येत अचानक वाढ. दवाखाने, हॉस्पिटल्स येथे गर्दी. |
जास्तीच्या संख्येने लोक आजारी पडतात. कदाचित दगावतात देखील.औषधांच्या दुकानात गर्दी होते. |
सामुदायिक लसीकरण आणि रोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना राबवणे. |
पाणीटंचाई | पाणी तुटवडा भासतो. गावच्या ठिकाणी दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. शहरात नळाला पाणी वेळेवर येत नाही. | कोरडा दुष्काळ पडतो. पाण्याअभावी शेतातील पिके करपतात. जनावरे मरतात.माणसांना स्थलांतर करावे लागते. | पाणी नियोजनाचे प्रकल्प हाती घ्यावेत. पर्जन्यजलसंचय, जलसंधारण अशा योजना राबवाव्यात. |
टोळधाड | उभ्या पिकांचे नुकसान होऊ लागते. मोठ्या संख्येने कीटक शेतात दिसतात. | पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. | योग्य प्रकारे सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी करावी. |
आर्थिक मंदी | देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याची लक्षणे दिसतात. शेअरबाजारात मंदी आढळते. |
गरिबी वाढते, लोकांची खरेदी-विक्रीची उलाढाल बऱ्याच प्रमाणात कमी होते. संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. |
व्यवसायासाठी मदत करण्याच्या योजना राबवाव्यात. नोकरीच्या संधी वाढवाव्यात. |
पूर | नदी-नाल्याचे पाणी वाढताना दिसते. | किनाऱ्यानजीकच्या वस्तीत पाणी शिरते. सखल भागात पाणी साचते. संपूर्ण प्रदेश जलमय होतो. | सखल भागातून स्थलांतर करावे. सुरक्षेच्या दृष्टीने पुराच्या पाण्यापासून दूर राहावे. पूर ओसरल्यानंतर रोगराईच्या साथी पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. |
दुष्काळ |
पुरेसा पाऊस पडत नाही. धरणाचे पाणी देखील आटते. पिके येत नाहीत. जमिनीला भेगा पडलेल्या दिसतात. पाण्याअभावी शेतकरी पिके घेऊ शकत नाहीत. |
लोक आणि जनावरे उपाशी राहतात.चारापाण्यावाचून गुरे, वासरे मरतात.अन्नाचा मोठा तुटवडा जाणवतो. | दुष्काळी भागात जलसंधारण इत्यादी उपाय पावसाच्या आधी करावे. पिकांच्या अनुकूल जाती रुजवाव्यात. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
जमिनीची धूप
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
कावीळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दुष्काळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी
पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.
आपत्ती | प्रकार |
त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | ______________ |
चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | ______________ |
वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | ______________ |
संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | ______________ |
विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | ______________ |