English

तक्ता पूर्ण करा.(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ) - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

तक्ता पूर्ण करा.

(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)

आपत्ती लक्षणे परिणाम उपाययोजना
       
       
Chart

Solution

आपत्ती लक्षणे परिणाम उपाययोजना
वाहन अपघात वाहतूक ठप्प होते. रस्त्यात गर्दी जमते. कोणीतरी जखमी झालेले असते. मोठ्या प्रमाणावर अपघात असेल तर जास्त लोक एकाच वेळी जखमी होतात. वाहनांचे नुकसान होते. प्रथम गर्दी हटवून पोलिसांना पाचारण करावे. जखमी व्यक्तीला प्रथमोपचार देऊन लगेच हॉस्पिटलमध्ये हलवावे.
दरड कोसळणे कोणत्या ठिकाणची दरड कोसळली आहे यावर लक्षणे आणि परिणाम अवलंबून आहेत. जर डोंगरकड्याला घरे असतील, तर लोकांची घरे गाडली जातात. रस्त्याच्या कडेची दरड कोसळली तर वाहतूक बंद पडेल. आपद्ग्रस्त लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून त्यांना वैद्यकीय मदत करणे.
वणवा सगळीकडे धूर साचतो. नैसर्गिक जंगलात वणवा पेटतो तेव्हा रानातले पशु-पक्षी सैरावैरा पळतात. आगीचे लोट नजरेस पडतात. सारे काही जळून खाक होते. अग्निशमन दलाला पाचारण करून जवळपासच्या वस्तीतील आग विझवायचा प्रयत्न केला पाहिजे. माणसे होरपळली असतील तर त्यांना वैदयकीय मदत दिली पाहिजे.
चोरी दाराचे कुलूप तोडलेले आढळते. घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसते.

मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. शिवाय त्याचे मानसिक परिणाम देखील गंभीर होतात. शारीरिक इजा होण्याचा संभव असतो.

पोलिसांना पाचारण करून चोरांचा माग काढला पाहिजे.
दंगल शहरात/गावात अस्वस्थता जाणवते. लोकांचे घोळके जमून उलटसुलट चर्चा करीत असतात. सर्वांचेच नाहक आर्थिक नुकसान होते. माणसे मारली जातात. एकमेकांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. स्त्रिया आणि लहान मुलांवर अत्याचार होतात. दंगल रोखणे हे छोट्या मुलांचे काम नाही. त्यासाठी पोलीसदल काही उपाय करू शकते. शांतता समिती स्थापन करून प्रत्येक वस्तीतील लोकांना त्यात सहभागी करून घेतले जाते.
युद्ध देशाच्या सीमाप्रांतांत गंभीर वातावरण, दोन्ही देशांच्या एकमेकांच्या कुरापती काढणे चालू होते.

अतोनात हानी. सर्व प्रकारचे नुकसान,अनेक मृत्युमुखी, महागाईमध्ये वाढ, अन्नधान्याचा तुटवडा. संपूर्ण देशातच असुरक्षिततेची भावना.

दोन शत्रूराष्ट्रांत शांतता करार आणि सामंजस्य निर्माण करणे.
रोगाची साथ आजारी लोकांच्या संख्येत अचानक वाढ. दवाखाने, हॉस्पिटल्स येथे गर्दी.

जास्तीच्या संख्येने लोक आजारी पडतात. कदाचित दगावतात देखील.औषधांच्या दुकानात गर्दी होते.

सामुदायिक लसीकरण आणि रोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना राबवणे.
पाणीटंचाई पाणी तुटवडा भासतो. गावच्या ठिकाणी दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. शहरात नळाला पाणी वेळेवर येत नाही. कोरडा दुष्काळ पडतो. पाण्याअभावी शेतातील पिके करपतात. जनावरे मरतात.माणसांना स्थलांतर करावे लागते. पाणी नियोजनाचे प्रकल्प हाती घ्यावेत. पर्जन्यजलसंचय, जलसंधारण अशा योजना राबवाव्यात.
टोळधाड उभ्या पिकांचे नुकसान होऊ लागते. मोठ्या संख्येने कीटक शेतात दिसतात. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. योग्य प्रकारे सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी करावी.
आर्थिक मंदी देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याची लक्षणे दिसतात. शेअरबाजारात मंदी आढळते.

गरिबी वाढते, लोकांची खरेदी-विक्रीची उलाढाल बऱ्याच प्रमाणात कमी होते. संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते.

व्यवसायासाठी मदत करण्याच्या योजना राबवाव्यात. नोकरीच्या संधी वाढवाव्यात.
पूर नदी-नाल्याचे पाणी वाढताना दिसते. किनाऱ्यानजीकच्या वस्तीत पाणी शिरते. सखल भागात पाणी साचते. संपूर्ण प्रदेश जलमय होतो. सखल भागातून स्थलांतर करावे. सुरक्षेच्या दृष्टीने पुराच्या पाण्यापासून दूर राहावे. पूर ओसरल्यानंतर रोगराईच्या साथी पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
दुष्काळ

पुरेसा पाऊस पडत नाही. धरणाचे पाणी देखील आटते. पिके येत नाहीत. जमिनीला भेगा पडलेल्या दिसतात. पाण्याअभावी शेतकरी पिके घेऊ शकत नाहीत.

लोक आणि जनावरे उपाशी राहतात.चारापाण्यावाचून गुरे, वासरे मरतात.अन्नाचा मोठा तुटवडा जाणवतो. दुष्काळी भागात जलसंधारण इत्यादी उपाय पावसाच्या आधी करावे. पिकांच्या अनुकूल जाती रुजवाव्यात.
shaalaa.com
आपत्तींचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [Page 119]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 1 | Page 119
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×