Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
उत्तर
आई, आज मुसळधार पावसामुळे आपली चुकामूक झाल्यानंतर मी माहितीये कुठे पोहोचले? समुद्रात! समुद्राचे पाणी खूप खारट होते. पाण्यात मोठमोठे खडक होते, सुंदर फुले होती. मला एक घोडमासा दिसला. त्याचे तोंड अगदी घोड्यासारखे होते. तेव्हाच माझी ओळख कासवदादाशी झाली. आपल्या नदीतल्या कासवांपेक्षा तो खूप मोठा होता. त्याने मला आठ हातांचा अष्टभुज मासा दाखवला. शिंपल्यात मोती कसा बनतो तेही सांगितले. खेकड्याला बघून तर मी घाबरलेच; पण कासवदादाने त्याचीही माहिती दिली. कासवदादा मला आणखी खूप खोल समुद्रात नेऊन तिथली गंमत दाखवणार होता; पण मला भीती वाटली. मग कासवदादाने मला आपल्या नदीत आणून सोडलं. ते स्वत: मात्र लगेच निघाले कारण त्याला नदी आवडत नाही. आल्यापासून कधी एकदा सगळी गंमत तुला सांगते असे मला झाले होते.
संबंधित प्रश्न
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीला पत्र लिहिणारे -
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.