Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
उत्तर
आई, आज मुसळधार पावसामुळे आपली चुकामूक झाल्यानंतर मी माहितीये कुठे पोहोचले? समुद्रात! समुद्राचे पाणी खूप खारट होते. पाण्यात मोठमोठे खडक होते, सुंदर फुले होती. मला एक घोडमासा दिसला. त्याचे तोंड अगदी घोड्यासारखे होते. तेव्हाच माझी ओळख कासवदादाशी झाली. आपल्या नदीतल्या कासवांपेक्षा तो खूप मोठा होता. त्याने मला आठ हातांचा अष्टभुज मासा दाखवला. शिंपल्यात मोती कसा बनतो तेही सांगितले. खेकड्याला बघून तर मी घाबरलेच; पण कासवदादाने त्याचीही माहिती दिली. कासवदादा मला आणखी खूप खोल समुद्रात नेऊन तिथली गंमत दाखवणार होता; पण मला भीती वाटली. मग कासवदादाने मला आपल्या नदीत आणून सोडलं. ते स्वत: मात्र लगेच निघाले कारण त्याला नदी आवडत नाही. आल्यापासून कधी एकदा सगळी गंमत तुला सांगते असे मला झाले होते.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीला पत्र लिहिणारे -
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
हे शब्द असेच लिहा.
जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे. |
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?