Advertisements
Advertisements
प्रश्न
व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.
उत्तर
व्युत्पत्ती कोशात शब्दासमोर सुरुवातीला शब्दाची जात देण्यात येते. नाम असेल, तर त्याचे लिंग लघुरूपात. (पु., स्त्री., नपुं.) लिहिले जाते. वेगवेगळ्या भाषांमधील त्या शब्दाचे रूप देताना त्या भाषांसाठी लघुरूप (संस्कृत-सं., हिंदी-हिं.) वापरलेले असते, तसेच त्या शब्दामागचा इतिहास कोशकार सांगतात. त्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली व्युत्पत्ती असल्यास ती व्युत्पत्ती तेथे दिली जाते. ती कोशकारांना योग्य वाटते, की नाही त्यावरचे मत कोशकार येथे व्यक्त करतात.
उदाहरण. दिवाळी स्त्री दिव्यांची रांग, एक सण (दिव्यांसंबंधी) A row of lights (hence) a Hindu Festival with noturnal illuminations (सं. दीपावलि, दीपालि; प्रा. दिवाली, दीवावली, बं. दिउयाली, ओ. दिआली; हिं/पं. दिवाली, सिं. डिआरी, गु. दिवाळी) दिवाळी हा शब्द व्युत्पत्ती कोशात पाहताना तो स्त्रिलिंगी शब्द आहे. त्याचा अर्थ दिव्याची रांग, दिव्यांसंबंधी एक सण असा आहे. त्याचा इंग्रजी भाषेत अर्थ दिला आहे. पुढे विविध भाषेत या शब्दाची नावे दिली आहेत. सं = संस्कृत, प्रा = प्राकृत, बं = बंगाली, ओ = ओडिसी, हिं/पं = हिंदी/पंजाबी, सिं = सिंधी, गु = गुजराती या भाषा आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
टिपा लिहा.
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
शब्द अनेक, अर्थ एक | व्युत्पत्ती कोश | शब्द एक, अर्थ अनेक |
उदा., जल, नीर, तोय... - पाणी | उदा., पान - पान - झाडाचे पान (पर्ण) पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ) |
व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.
व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोशाची निर्मिती
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोश
पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.
व्युत्पत्ती कोश | ||
निर्मितीचा ठराव | निर्मितीची जबाबदारी | निर्मितीसाठी अर्थसाहाय्य |
व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.