मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5, आहे, तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5, आहे, तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा.

बेरीज

उत्तर

समजा, निळ्या चेंडूची संख्या x आहे.

लाल चेंडूची संख्या = 8

∴ चेंडूंची एकूण संख्या = (x + 8)

P (निळ्या चेंडूची संभाव्यता) = `x/(x + 8)`

P (लाल चेंडूची संभाव्यता) = `8/(x + 8)`

दिलेल्या अटीनुसार, लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5 आहे.

∴ `(8/(x + 8))/(x/(x + 8)) = 2/5`

∴ `8/(x + 8) = 2/5 xx x/(x + 8)`

∴ 40(x + 8) = 2x(x + 8)

∴ 40x + 320 = 2x2 + 16x

∴ 2x2 - 24x - 320 = 0

∴ x2 - 12x - 160 = 0

∴ x2 - 20x + 8x - 160 = 0

∴ x(x - 20) + 8(x - 20) = 0

∴ (x - 20) (x + 8) = 0

∴ x - 20 = 0 किंवा x + 8 = 0

∴ x = 20 किंवा x = -8

परंतु, चेंडूची संख्या ऋण असू शकत नाही.

∴ x = 20

∴ पिशवीतील निळ्या चेंडूची संख्या 20 आहे.

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे. 


तीन नाणी एकाचवेळी फेकली असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: एकही छापा न मिळणे.

ii) घटना B: कमीत कमी दोन छाप मिळणे.


अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

ती संख्या 5 च्या पटीत असेल.


एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

गोलरक्षक हा संघनायक असणे.


जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे, तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा निळा असणे.


खालील कृती करा.

नमुना अवकाश स्वत: ठरवून खालील चौकटी भरा.

नमुना अवकाश घटना A साठी अट
'सम संख्या मिळणे' ही आहे.
S = {        } A = {       }
n(S) = _____ n(A) = _____

P(A) = `square/square = square`


एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.


एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे


एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा:

घटना B: काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×