मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृती मध्ये, रेख YZ आणि रेख XT हे ΔWXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात तर सिद्ध करा, (1) □WZPT हा चक्रीय आहे. (2) बिंदू X, Z, T, Y एकाच वर्तुळावर आहेत. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती मध्ये, रेख YZ आणि रेख XT हे ΔWXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात तर सिद्ध करा,

(1) `square`WZPT हा चक्रीय आहे.

(2) बिंदू X, Z, T, Y एकाच वर्तुळावर आहेत. 

बेरीज

उत्तर

पक्ष: रेख YZ ⊥ रेख XW

रेख XT ⊥ रेख WY

साध्य: 

(1) `square`WZPT हा चक्रीय आहे.

(2) बिंदू X, Z, T, Y एकाच वर्तुळावर आहेत. 

सिद्धता:

(1) रेख YZ ⊥ रेख XW .....[पक्ष]

∴ ∠PZW = 90°  ....(i)

रेख XT ⊥ रेख WY .......[पक्ष]

∴ ∠PTW = 90° ......(ii)

∠PZW + ∠PTW = 90° + 90°  ....[(i) व (ii) ची बेरीज करून]

∴ ∠PZW + ∠PTW = 180° 

`square`WZPT हा चक्रीय चौकोन आहे.  .....[चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास]

(2) ∠XZY = ∠YTX = 90° .....[पक्ष]

∴ रेषा XY वरील बिंदू X व Y हे रेषा XY च्या एकाच बाजूला एकरूप कोन निश्चित करतात. 

∴ बिंदू X, Z, T व Y हे एकाच वर्तुळावर आहेत.  ....[रेषेचे दोन भिन्न बिंदू, त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील, तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात.] 

shaalaa.com
चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: वर्तुळ - सरावसंच 3.4 [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 3 वर्तुळ
सरावसंच 3.4 | Q 6. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×