मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपडया बांधणे, अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपडया बांधणे, अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात्‌ ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्वांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते.

बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते.

आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतले त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जिवामध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला.

थोडक्यात उत्तर

उत्तर

आनंदवनमध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र व निवारा यांची सोय केली. यासाठी त्यांना अनेक कष्ट करावे लागले. आनंदवनात कुष्ठरोग्यावर उपचार करून भंगलेले शरीर व खचलेले मन यांना उभारी देऊन स्वतःच्या पायावर उभे राहून ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळून त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या जीवनात आत्मविश्वासाने आनंद निर्माण व्हावा. यासाठी आनंदवनची धडपड शुरू असते. यासाठी बाबांनी ५० वर्षे अफाट कष्ट घेवून अंध, अपंग व महारोगी यांना सुंदर मी होणार यासोबत सुंदर मी करणार हा मंत्र दिला.

shaalaa.com
सारांश लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2018-2019 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा. 

‘‘...एक विचारू?’’
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले.
‘‘हं.’’
‘‘मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय... पण..’’
‘‘पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?’’
‘‘...हो.’’
‘‘अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..’’
‘‘पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?’’
‘‘हो! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात...’’
...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला!
                                                                              (गुलमोहर)

सारांशलेखन:

विवभाग १ गद्य (इ) (प्रश्न. क्र. १ - इ) मधील अपठित उतार्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.


           संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे.

वरील उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.


खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते.

नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य!

या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.


खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.


खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली, विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो.

खालील उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.

खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

           सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते.


खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

वनस्पतींमध्ये अखंड चोवीस तास पाणीपुरवठा होत असतो. घरातल्या नळाला जसं पाईपलाईनने पाणी पुरवलं जातं. तसं वनस्पतींमध्येही अनेक छोटे पाईप (झायलेम) एकमेकांवर बसवलेले असतात. त्यामुळे मुळांमध्ये जमिनीतून शोषलेलं पाणी या लांबलचक तयार झालेल्या पाईपद्वारे झाडांच्या शेंड्यापर्यंतही पुरवलं जातं. वनस्पतींमधलं स्वयंपाकघर म्हणजे हिरवी पानं! हरितद्रव्याच्या साहाय्यानं, सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानं अन्न तयार करतात. ते विशिष्ट प्रकारच्या पेशींमधून (फ्लोएम) झाडाच्या इतर भागांपर्यंत पोहोचवलं जातं, त्या-त्या भागात अन्नावर प्रक्रियाही होते. याशिवाय गरजेनुसार या पेशींशिवाय अनेक पेशी असतात. त्यांची कामंही निरनिराळी असतात. काही वनस्पती पाण्यात राहूनही भिजत नाही; कारण त्यांच्या पेशींवर मेणाचा थर असतो. काही पाण्यात तरंगतात, कारण त्यांच्यात हवेच्या पिशव्या असतात. अशा अनेक विविध प्रकारच्या पेशी वेगवेगळ्या झाडात त्यांच्या गरजेनुसार आणि झाडांच्या गुणधर्मानुसार असतात.

खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

           मी काशीत असताना गंगेच्या काठावर जाऊन गात बसायचो. रात्रीच्या एकांत वेळी मी गात असे. किती सुंदर व प्रसन्न तो प्रवाह! तिचा तो भव्य गंभीर प्रवाह व तिच्या पोटात साठविलेले ते आकाशातील अनंत तारे. मी मुका होऊन जात असे. शंकराच्या जटाजटातून म्हणजेच या हिमालयातून वाहत येणारी ती गंगा. तिच्या तीरावर राज्ये तृणवत समजून फेकून देऊन राजे तपश्चर्येसाठी येऊन बसत. अशी ती गंगा पाहून मला शांत-शांत वाटे. त्या शांतीचे वर्णन कसे करू? बोलण्याची तेथे सीमा होई. मेल्यावर आपल्या अस्थी गंगेत पडाव्या असे हिंदू मनास का वाटते ते समजून येई. तुम्ही हसा. तुम्ही हसलात म्हणुन काही बिघडत नाही. परंतु मला या भावना फार व संग्रह करण्यासारख्या वाटतात. मरताना दोन थेंब गंगेचे तोंडात घालतात. ते थेंब म्हणजे परमेश्वर मुखात अवतीर्ण होतो. ती गंगा म्हणजे परमात्मा. परमेश्वराची ती करुणा वाढून राहिली आहे. गंगेच्या ठिकाणी परमेश्वर न दिसेल तर तो कोठे दिसणार? सूर्य, नद्या, तो धो-धो आवाज करणारा व उचंवणारा विशाल सागर या परमेश्वराच्या मूर्तीच आहेत.

खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

            आपण जेथे राहू आणि पाहू तेथे परमेश्वरच आहे. आपण आंधळे आहोत. आपण झाडामाडातच देव पाहतो; परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही. आपणास चार तोंडाचा, आठ हातांचा असा देव हवा असतो. मनुष्याहून किती तरी निराळा असा देव आपणास हवा असतो. मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला देव आपणास दिसत आहे. या मानवाजवळ आपण भांडतो. त्याला आपण गुलाम करतो त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो. भगवंतांना याचे आश्चर्य वाटते, तो म्हणतो, “अरे मनुष्यातील देव पाहा. हाच बोलता-चालता देव आहे. याचे स्वरूप बघा- याला काय हवे, नको ते पाहा.” दगडाच्या देवाला काय आवडते हेही आपण ठरवून टाकले आहे.

            गणपतीला मोदक आवडतो, विठोबाला लोणी आवडते, खंडोबाला खोबरे हवे; परंतु मानवाला काय हवे? याची विवंचना आपण कधी करतो काय? आपल्या सभोवती दोन हातापायांचा देव उभाआहे त्याच्या पोटात अन्न नाही, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, त्याच्या पूजेला आपण येतो का धावून?


खालील उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

          दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.”

          रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्‍वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’


खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश लिहा.

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामत: पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×