Advertisements
Advertisements
प्रश्न
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.
शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
(१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
(२) | |||||
(३) | |||||
(४) | |||||
(५) |
उत्तर
शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
(१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
(२) | डोळे मिटणे. | चिमणीच्या चोचीने खाणे. | हृदयात कालवाकालव होणे. | वड्याचे तेल वांग्यावर | एक ना धड भाराभर चिंध्या |
(३) | पोटात दुखणे. | कोल्ह्याला द्राक्षे आंबट | मन चिंती ते वैरी न चिंती | खाई त्याला खवखवे | इकडे आड, तिकडे विहीर |
(४) | डोके फिरणे. | गाढवाला गुळाची चव काय? | भित्यापाठी ब्रह्मराक्षस | तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले. | पळसाला पाने तीनच |
(५) | बुडत्याचा पाय खोलात. | माकडाला चढली भांग | प्राणपणाने लढणे. | दुधाची तहान ताकावर | तळे राखी तो पाणी चाखी. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
हरसाल -
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
काल शब्द शिकून घेतले.
‘जोडशब्द’ लिहा.
चढ-
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
तोंड -
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
सभोवार दाट झाडी होती.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
दूरवर ×
परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ______ झाली.
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
ऊनसावली -
ओळखा पाहू!
केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______
असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.
उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......
श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
हॅलो काका, मी संजू बोलतोय.
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
आजी, तुम्ही या जागेवर बसा.
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
मऊ × ______
खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
- वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या?
- अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात?
- अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती’’
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
संजीवनी मिळणे.