Advertisements
Advertisements
Question
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.
शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
(१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
(२) | |||||
(३) | |||||
(४) | |||||
(५) |
Solution
शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
(१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
(२) | डोळे मिटणे. | चिमणीच्या चोचीने खाणे. | हृदयात कालवाकालव होणे. | वड्याचे तेल वांग्यावर | एक ना धड भाराभर चिंध्या |
(३) | पोटात दुखणे. | कोल्ह्याला द्राक्षे आंबट | मन चिंती ते वैरी न चिंती | खाई त्याला खवखवे | इकडे आड, तिकडे विहीर |
(४) | डोके फिरणे. | गाढवाला गुळाची चव काय? | भित्यापाठी ब्रह्मराक्षस | तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले. | पळसाला पाने तीनच |
(५) | बुडत्याचा पाय खोलात. | माकडाला चढली भांग | प्राणपणाने लढणे. | दुधाची तहान ताकावर | तळे राखी तो पाणी चाखी. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
तोंडात मूग धरून बसणे
खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.
(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)
विरामचिन्हे - |
नावे |
; |
|
....... |
|
– |
|
: |
|
- |
तक्ता पूर्ण करा.
खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.
घडोघडी, बरेवाईट, पाप किंवा पुण्य, प्रतिक्षण, मीठभाकरी, जन्मापासून मरेपर्यंत, खरेखोट |
अ.क्र. | सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(१) | |||
(२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
(३) | |||
(४) | |||
(५) | |||
(६) | |||
(७) |
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
फुले -
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) काळजाला घरे पडणे. | (अ) त्रासून जाणे. |
(२) मनमानी करणे. | (आ) प्रचंड दु:ख होणे. |
(३) हैराण होणे. | (इ) मनाप्रमाणे वागणे. |
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
घरामंदी -
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
दिवसापासून -
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
गणू म्हणाला अग आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
तुला लाडू आवडतो का
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,
- टेप आणा आपटे.
- तो कवी ईशाला शाई विकतो.
- ती होडी जाडी होती.
- हाच तो चहा.
- सर जाताना प्या ताजा रस.
- काका, वाचवा, काका.
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
मोठे × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
जाणे × ______
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
लहान × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
मऊ × ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
एकदा ते गंगेच्या तीरावर गेले.
शब्द | शब्दांची जात |
ते | ______ |
तीर | ______ |
गंगा | ______ |
वर | ______ |
गेले | ______ |
खालील शब्दाचा लिंग ओळखा.
पहाट - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
गुलाब जास्वंद माेगरा ही माझी आवडती फुले आहेत