Advertisements
Advertisements
प्रश्न
अभिव्यक्ती.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर
आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे. या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात. पहाटे पहाटे आपापल्या खोपटात चुलीवर जेवण करतात. जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो. त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी-भाकरी करीत असतात. लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून नि छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात.
कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात. ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात अन् मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते. न थकता ओझे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमानेइतबारे दिवसभर उन्हातान्हात पायऱ्यांवरून चढ-उतार करून आपले काम नेटाने करतात. दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ-भाकर खाऊन तिथल्याच एखादया नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून त्यांचे ओझी उचलणे सुरू होते. दिवस सरून गेल्यावर जड पावलांनी घरी परततात. मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात. पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल, रडणारे मूल व 'आ'वासलेली भुकेली तोंडे हेच येते. काहीही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) नाही कांदा गं, जीव लावते. | (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. |
(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते. | (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. |
(३) हिरवी होऊन, मागं उरते . | (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. |
खालील ओळींचा अर्थलिहा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काव्यसौंदर्य.
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
काव्यसौंदर्य.
‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
अभिव्यक्ती.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
खालील ओळींचा अर्थ लिहा:
सरी-वाफ्यात, कांदं लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते |
‘सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते’
या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)
(य) ______
(र) ______
(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)
(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)
(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)
सरी-वाफ्यात, कांदं लावते फुलं सोन्याची, झेंडू तोडते ऊस लावते, बेणं दाबते उन्हातान्हात, रोज मरते |
(३) अभिव्यक्ती - (४)
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.