Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळींचा अर्थ लिहा:
सरी-वाफ्यात, कांदं लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते |
उत्तर
कष्टकरी शेतकरी महिला तिच्या शेतातील वाफ्यांमध्ये कांद्याची रोपं लावत आहे. ती म्हणजे ही कांद्यांची रोपं नसून मी माझा जीवच कांद्याच्या रोपांच्या रूपात लावत आहे. ती शेतकरी महिला अतिशय जीव ओतून शेतात काम करत आहे. तिच्या शेतातील पिकावर तिचे जीवापाड प्रेम असते. तिच्या काळ्या-भोर जमिनीत कांद्यांची लागवड करून ती ते काळभोर शेत हिरवं करत आहे. कांद्यांचं पीक चांगल यावं म्हणून ती दररोज शेतात अतिशय कष्ट घेत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) नाही कांदा गं, जीव लावते. | (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. |
(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते. | (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. |
(३) हिरवी होऊन, मागं उरते . | (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. |
खालील ओळींचा अर्थलिहा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काव्यसौंदर्य.
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
काव्यसौंदर्य.
‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
अभिव्यक्ती.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
अभिव्यक्ती.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
‘सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते’
या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)
(य) ______
(र) ______
(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)
(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)
(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)
सरी-वाफ्यात, कांदं लावते फुलं सोन्याची, झेंडू तोडते ऊस लावते, बेणं दाबते उन्हातान्हात, रोज मरते |
(३) अभिव्यक्ती - (४)
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.