मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

अग्निमाजि पडे बाळू। माता धांवें कनवाळू।।१।। तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।२।। खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: i माता धावून जाते - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)

  1. माता धावून जाते ______
  2. धरणीवर पक्षिणी झेपावते ______
  3. गाय हंबरत धावते ______
  4. हरिणी चिंतित होते ______

अग्निमाजि पडे बाळू।
माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।
पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।
धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।
पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा।।६।।

२. कोण ते लिहा. (२)

  1. परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
  2. मेघाची विनवणी करणारा - ______
  3. भुकेलेले - ______
  4. भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______

३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)

४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)

थोडक्यात उत्तर

उत्तर

१.

  1. बाळ आगीच्या तडाख्यात सापडते तेव्हा.
  2. आपली पिले धरणीवर कोसळताच.
  3. भुकेल्या वासराच्या आवाजाने.
  4. जंगलात वणवा लागताच आपल्या पाडसाच्या काळजीने.

२. 

  1. परमेश्वर कृपेची याचना करणारे - नामदेव महाराज
  2. मेघाची विनवणी करणारा - चातक
  3. भुकेलेले - वासरू
  4. भक्ताच्या हाकेला धावून येणारा - परमेश्वर

३. ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ या उक्तीप्रमाणे मानव, प्राणी किंवा पक्षी या प्रत्येकाचेच आपापल्या अपत्याच्या संरक्षणाकडे विशेषकरून लक्ष असते. चराचर सृष्टीतील ही वास्तविकता नामदेव महाराजांनी आपल्या ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात वर्णन केली आहे. ममता किंवा मातृत्व ही कल्पना मानव व मानवेतर प्राणी या सर्वांमध्येच दिसून येते. स्त्री ही वाहाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही मातेचे बाळ अग्रीमध्ये म्हणजेच संकटांत सापडणे ही कल्पनासुद्धा ती सहन करू शकत नाही. अशी ही दयाळू आई खरोखरच जर बाळ ‘अग्नीमध्ये’ सापडले तर आगीत उडी घ्यायलासुद्धा तयार असते आणि अशीच ममता मानवेतर प्राण्यांमध्येसुद्धा दिसून येते. वासराच्या केवळ हंबरण्याच्या आवाजाने गाय वासराजवळ जाऊन त्याची भूक भागविते याप्रमाणेच पक्षिणीसुद्धा तिचे मातृप्रेम दाखवून देते. पिळू जमिनीवर पडताक्षणीच पक्षिणी त्याच्याकडे झेपावते या वरून मातृप्रेमाची भावना मानव व मानवेतर प्राणी सर्वांकडे सारखीच असल्याचे दिसून येते

४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ ही काव्यपंक्ती नामदेव महाराजांनी लिहिलेल्या ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगातील असून यात परमेश्वराचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नामदेव महाराज मनापासून प्रार्थना करतात. आगीत सापडलेल्या बालकाची स्वत:मध्ये भूमिका स्वतःमध्ये पाहत ते परमेश्वराला म्हणतात की संकटात सापडलेल्या बालकाकडे म्हणजे भक्ताकडे धावत येतो हे तुझे कर्तव्य आहे कारण मी तुझा अंगीकारलेला दास आहे आणि हे परमेश्वर तू माझा स्वामी आहेस, माझे संकट हे तुझे संकट आहे असे समजून मायेच्या ममतेने तू या बालकाकडे नक्कीच धावत येशील.

shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2018-2019 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

माता धावून जाते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

धरणीवर पक्षिणी झेपावते ______.


आकृती पूर्ण करा.


कोण ते लिहा.

परमेश्वराचे दास -


कोण ते लिहा.

मेघाला विनवणी करणारा -


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’


आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.


संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.


पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

 अ) आगीत पडणारे - ______ 

 ब) हुंबरत धावणारी - ______

अग्निमाजि पडे बाळू।

माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।

अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।

पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।

धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।

पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।

विनवितो चातक तैसा।।६।।

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. धरणी -

२. वन -

३. मेघ -

४. काजा -

४- काव्यसाैंदय

'तैसा धांवे माझिया काज। अंकिला मी दास तुझा।।' या ओळीतील भावसाैंदर्य स्पष्ट करा. (०२)


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)

'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'

४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)

१. अंकिला -

२. माता -

३. दास -

४. मेघ -


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'अंकिला मी दास तुझा'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू ।
माता धांवें कनवाळू।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘अंकिला मी दास तुझा’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ -  ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) माता -
(ii) कनवाळू -
(iii) काज -
(iv) धेनू -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.