मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कृती ‘अंकिला मी दास तुझा’ (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय - (3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘अंकिला मी दास तुझा’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ -  ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) माता -
(ii) कनवाळू -
(iii) काज -
(iv) धेनू -
तक्‍ता पूर्ण करा

उत्तर

कृती ‘अंकिला मी दास तुझा’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  कवी - संत नामदेव
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  आई, प्राणी, पक्षी यांच्या विविध दृष्टांतातून मातेच्या वात्सल्यपूर्ण प्रेमाचे वर्णन करत, कवीने या अभंगात भक्तवत्सल विठाईमाऊलीच्या कृपेची याचना केली आहे.
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  कवी संत नामदेव महाराज यांनी श्री विठ्ठलावर कृपा करण्याची विनंती करताना देवाशी अतिशय जवळचे नाते जोडले आहे. त्यांनी यासाठी आई-बाळ, पक्षिणी-पिल्लू, धेनू-वासरू, हरिणी-पाडस यांसारखी समर्पक उदाहरणे दिली आहेत. परमेश्वर कृपेची तीव्र इच्छा कवीने मेघ व चातक यांच्या उदाहरणातून अतिशय प्रभावीपणे व्यक्त केली आहे. वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलावरील कवीची नितांत श्रद्धा आणि उत्कट भक्ती यांनी भरलेला हा अभंग मला खूप आवडतो.
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ -  संत नामदेव महाराज विठाईमाऊलीची कृपा मागताना हरिणी आणि तिच्या पाडसाचा दृष्टांत देतात. ते म्हणतात, 'हे परमेश्वरा, जंगलात वणवा पेटलेला पाहून हरिणी आपल्या पाडसाच्या सुरक्षिततेसाठी चिंतीत होते. त्या पाडसाप्रमाणेच माझीही अवस्था झाली आहे. त्यामुळे तू माझ्यासाठी लवकरात लवकर धावून ये.
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) माता - आई, जननी
(ii) कनवाळू - ममताळू
(iii) काज - काम
(iv) धेनू - गाय
shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

माता धावून जाते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

धरणीवर पक्षिणी झेपावते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

गाय हंबरत धावते ______.


कोण ते लिहा.

परमेश्वराचे दास -


कोण ते लिहा.

मेघाला विनवणी करणारा -


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’


आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.


संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.


पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)

'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'

४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)

१. अंकिला -

२. माता -

३. दास -

४. मेघ -


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'अंकिला मी दास तुझा'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू ।
माता धांवें कनवाळू।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) अंकिला -
(ii) कनवाळू -
(iii) माझिया -
(iv) वणवा -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×