Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)
मुद्दे:
१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)
'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'
४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)
५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)
६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)
१. अंकिला -
२. माता -
३. दास -
४. मेघ -
उत्तर
१. कवी - संत नामदेव
२. कवितेचा विषय - परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा
३. पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीण लगेच तेथे झेप घेते.
४. 'अंकिला मी दास तुझा' हा अभंग मला फार आवडतो, कारण अभंगाची भाषा साधी-सरळ आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टान्त (उदाहरणे) देऊन नामदेवांनी आपला उत्कट भाव कवितेत व्यक्त केला आहे. छोटे छोटे चरण (ओळी) वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अभंगात 'बिंदूमध्ये सिंधू' म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्त करण्याची शक्ती आहे, हे या अभंगातून दिसून येते. ही संतकविता गाता येते. तसेच, ती वाचनीय, श्रवणीय असल्यामुळे मला फार आवडते.
५. प्रस्तुत अभंगातून संत नामदेव परमेश्वराला आई मानून त्याने त्याच्या मुलाप्रमाणे आपला सांभाळ करावा अशी आळवणी करतात. मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवर पूर्णपणे अवलंबून असते त्याप्रमाणे आपणही परमेश्वरचरणी पूर्णपणे लीन व्हावे. यामुळे, परमेश्वर आपल्या भेटीसाठी आतुरतेने धाव घेईल असा विश्वास ते या अभंगातून व्यक्त करतात.
६.
१. अंकित झालेला
२. आई, जननी
३. सेवक
४. ढग
APPEARS IN
संबंधित प्रश्न
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
माता धावून जाते ______.
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
धरणीवर पक्षिणी झेपावते ______.
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
गाय हंबरत धावते ______.
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
हरिणी चिंतित होत ______.
आकृती पूर्ण करा.
कोण ते लिहा.
परमेश्वराचे दास -
कोण ते लिहा.
मेघाला विनवणी करणारा -
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’
संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | 'अंकिला मी दास तुझा' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. काज - ii. सवें - iii. पाडस - iv. धेनू - |
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)
- माता धावून जाते ______
- धरणीवर पक्षिणी झेपावते ______
- गाय हंबरत धावते ______
- हरिणी चिंतित होते ______
अग्निमाजि पडे बाळू। तैसा धांवें माझिया काजा। सवेंचि झेंपावें पक्षिणी। भुकेलें वत्सरावें। वणवा लागलासे वनीं। नामा म्हणे मेघा जैसा। |
२. कोण ते लिहा. (२)
- परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
- मेघाची विनवणी करणारा - ______
- भुकेलेले - ______
- भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______
३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)
४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘अंकिला मी दास तुझा’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) अंकिला - |
(ii) कनवाळू - | |
(iii) माझिया - | |
(iv) वणवा - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
कृती | ‘अंकिला मी दास तुझा’ |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - | ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’ |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ - | (i) माता - |
(ii) कनवाळू - | |
(iii) काज - | |
(iv) धेनू - |