मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी, इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी, इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. काही दाम्पत्याला मूल हवे असून होत नाही. अशा वेळी माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजननक्षमतेत काहीदोष असू शकतो. अशा वेळी भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी किंवा IVF यांसारखी आधुनिक तंत्रे वापरली जातात.
  2. स्त्रीच्याबाबत मासिक पाळीतील अनियमितता अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपणक्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही.
  3. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशी पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते. पण आधुनिक वैद्यकतंत्रज्ञानामुळे आता या अडचणींवर मात करता येते. यासाठी पुढील उपाय करता येतात:
  • भाडोत्री मातृत्व: ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम असते अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. या पद्धतीत जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या अंडपेशीचे काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशी चा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो.
  • काचनलिकेतील फलन: अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काच नलिकेमध्ये घडवून आणले जाते. या फलनातून तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते.
  • वीर्य पेढी: जर पुरुषामध्ये शुक्राणुनिर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल तर अशा दाम्पत्यांना वीर्यपेढीचा लाभ घेऊन अपत्यप्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्यांकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. या वीर्यपेढीतले वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते.
shaalaa.com
प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान (Reproduction and advanced technology)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 10 | पृष्ठ ३५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×