Advertisements
Advertisements
प्रश्न
भूगोलविषयाचे स्वरूप गतिशील आहे.
उत्तर
भूगोल तज्ज्ञ भौगोलिक घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या चौकटीतच करतात. मात्र हे स्पष्टीकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीने अधिक सखोल सर्वव्यापी माहिती संकलन आणि विदा विश्लेषणाची गरज पडत आहे. त्यासाठी विविध प्रतिमानांचा वापर करून अंदाज वर्तवण्याचे कार्यही भूगोल तज्ज्ञ करीत आहेत. याच प्रक्रियेत भूगोलाच्या विविध अंतरशास्त्रीय शाखांच्या कक्षाही विस्तारत असून भूगोलाचे स्वरूप अधिकच गतिशील होत आहे.
भूगोलाच्या अभ्यासात आता नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. दृकश्राव्य माध्यमे, माहिती-तंत्रज्ञान, संगणक प्रणालींचा यथायोग्य वापर, विदा विश्लेषण, माहिती स्रोतांचा विस्तार, सादरीकरण व त्यातील नावीन्य या सर्वांचा आता मुक्तपणे वापर करण्यात येत आहे. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS (Geographical Information System), भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS (Geographical Positioning System) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता नकाशा बनवले जातात. थोडक्यात, भूगोलाच्या अभ्यासकाला आता संगणकाचे अतिरिक्त ज्ञान आणि कौशल्य माहीत असणे आवश्यक आहे. या सर्वांचा एक परिणाम म्हणून भूगोल या मूळ ज्ञानशाखेचे स्वरूप बदलत असून, ते आता अधिकाधिक गतिशील होत आहे. तसेच त्यातून उपयोजित भूगोल ही ज्ञानशाखा म्हणून उदयास येत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे.
भूगोलाच्या शाखा.
भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य.
भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
निसर्गवाद आणि संभाव्यवाद.
भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य
अचूक गट ओळखा.
ज्यामध्ये १७ खंडाचा समावेश आहे, असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश:
पुढील चुकीचा घटक ओळखा.
भूगोल अभ्यासकाची कौशल्ये -
पुढील चुकीचा घटक ओळखा.
प्राकृतिक भूगोलाच्या शाखा -