Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
उत्तर १
- भूगोलाच्या अध्ययनासाठी दोन परस्परविरोधी किंवा स्वतंत्र दृष्टिकोन आहेत – संभाव्यवाद आणि निसर्गवाद. या दृष्टिकोनातील विरोधाभासाला भूगोलातील द्वैतवाद म्हणतात.
- काही भूगोल तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून निसर्ग हा मानवोपेक्षा श्रेष्ठ आहे, यास निसर्गवाद असे म्हणतात. त्यांच्या मते, भूगोलाचा अभ्यास म्हणजे पृथ्वीचा अभ्यास. नैसर्गिक संसाधनांचा आर्थिक क्रियाकलापांवर तसेच लोकांच्या खाण्याच्या सवयींवर कसा प्रभाव पडतो याचा आम्ही अभ्यास करतो.
- उदाहरणार्थ, किनारपट्टी भागांमध्ये मासेमारी व्यवसाय अधिक विकसित असतो आणि तेथील लोकांचे मुख्य अन्न मासे असते.
- काही भूगोलतज्ज्ञ मते मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो, यास संभाव्यवाद असे म्हणतात. त्यांच्या मते, मानव आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर निसर्गात बदल करू शकतो.
- उदाहरणार्थ, ध्रुवीय प्रदेशातसुद्धा पॉली हाऊसेस उभारून कृत्रिम तापमान नियंत्रणाद्वारे भाजीपाला उत्पादन केले जाते.
- याशिवाय, अनेक इतर विचारसरणीचे भूगोलतज्ज्ञही आहेत, त्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
उत्तर २
सुरुवात भूगोलाचे स्वरूप हे प्रामुख्याने वर्णनात्मक होते. हेकेटस, टॉलेमी, स्ट्रॅबो यांनी भूगोल विषयावर विपुल लेखन केले. हेकेटस या ग्रीक तत्त्ववेत्त्याने आणि स्ट्रॅबो या रोमन तत्त्ववेत्त्याने जगाचा नकाशा तयार करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि विपुल लेखनामुळे भूगोल तज्ज्ञांना विश्लेषण करण्याची क्षमता आणि त्याचे महत्त्व कळले. या विश्लेषण क्षमतेतूनच भूगोल अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी दृष्टिकोनांचाही विकास झाला. कोणत्याही ज्ञानशाखेच्या विकासात अशा विविध दृष्टिकोनांचा उगम आणि पुढे त्याची अधिक चिकित्सा नेहमीच मोलाची भर घालते. या विविध दृष्टिकोनामुळे पुढे भूगोलामध्ये भौगोलिक तत्त्वज्ञानाच्या निसर्गवाद आणि संभाव्यवाद या प्रमुख शाखा उदयास आल्या. अशाप्रकारे भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी म्हणजे विविध दृष्टिकोनांना पाठबळ देणारे आणि त्यादृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र असे झाले.
संबंधित प्रश्न
मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे.
भूगोलविषयाचे स्वरूप गतिशील आहे.
प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध
भूगोलाच्या शाखा.
भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य.
फरक स्पष्ट करा.
निसर्गवाद आणि संभाव्यवाद.
भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य
ज्यामध्ये १७ खंडाचा समावेश आहे, असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश:
पुढील चुकीचा घटक ओळखा.
भूगोल अभ्यासकाची कौशल्ये -
पुढील चुकीचा घटक ओळखा.
प्राकृतिक भूगोलाच्या शाखा -