Advertisements
Advertisements
प्रश्न
चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.
उत्तर
चंद्रावरच्या शाळेतून खाली पाहिले असता आपली पृथ्वी निळ्याशार चेंडूसारखी दिसते. पृथ्वीवर खूप पाणी असल्यामुळे तिचा रंग अवकाशातून निळा दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे चंद्रावरून पृथ्वी उगवताना व मावळताना दिसते. पृथ्वी खूप दूर असल्यामुळे ती लहान दिसते. चंद्रावरून पृथ्वी पाहायला फार मजा येते.
संबंधित प्रश्न
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
चविष्ट -
खालील शब्द वाचा. लिहा.
सूर्य | चक्र | राष्ट्र | वाऱ्यावर |
कार्य | खग्रास | महाराष्ट्र | साऱ्यांचा |
पूर्व | प्रकाश | सौराष्ट्र | कोऱ्या |
सर्व | तक्रार | राष्ट्रध्वज | ताऱ्यांना |
कर्क | आम्र | राष्ट्रीय | चाऱ्याला |
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.