मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

१९३९ ते १९४५ या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे -

(१) पहिल्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी व्हर्सायच्या तहात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्रराष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला.
(२) जर्मनीत नाझी हिटलरने सत्ता हस्तगत करून व्हर्सायचा तह फेटाळून लावला.
(३) त्याने लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले. सैन्यबल, आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला.
(४) सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होते. रशिया बलिष्ठ होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खुपत होते. रशिया जर्मनीचा शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमक धोरणांकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्ष केले.
(५) १९३८ मध्ये जर्मनीने चेकोस्लाव्हाकियाचा सुडेटन प्रांत जिंकला. पोलंड या सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या तटस्थ राष्ट्रावर १९३९ मध्ये हिटलरने आक्रमण केले.
(६) शांतता टिकवण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला नाही. जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले.
(७) पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्र निर्मिती स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक राष्ट्र प्रगत विध्वंसक शस्त्रे तयार करू लागल्याने यूरोप दारूगोळ्याचा भरलेले कोठार बनले.
शस्त्रास्त्र वाढ, आक्रमक राष्ट्रांच्या कृतींकडे दुर्लक्ष, गटबाजीचे धोरण या कारणांमुळे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले.

shaalaa.com
दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: जागतिक महायुद्धे आणि भारत - स्वाध्याय [पृष्ठ ६५]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 8 जागतिक महायुद्धे आणि भारत
स्वाध्याय | Q ५.१ | पृष्ठ ६५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×