Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
टीपा लिहा
उत्तर
- दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला; तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली.
- कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैनिकांवर असलेला दरारा कमी झाला.
- या काळात भारतात स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता. नाविकदलाचा उठाव, जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते.
- यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली; त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
shaalaa.com
महायुद्धांचे भारतावरील परिणाम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?