Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
डॉ. कोटणीस
टीपा लिहा
उत्तर
(१) १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या पाच डॉक्टरांमध्ये डॉ. कोटणिसांचा समावेश होता.
(२) डॉ. द्वारकानाथ कोटणिसांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली.
(३) आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशांत मैत्रीचे संबंध निर्माण केले.
(४) पाच वर्षे चिनी सैनिकांची देखभाल करणाऱ्या डॉ. कोटणिसांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले.
shaalaa.com
महायुद्धांचे भारतावरील परिणाम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?