Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले.
टीपा लिहा
उत्तर
(१) दोन्ही महायुद्धांच्या कालखंडात भारत ही इंग्रजांची वसाहत होता. त्यामुळे भारताला स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता.
(२) भारताची इच्छा असो वा नसो, इंग्लंडने भारताला युद्धात सक्तीने सहभागी करून घेतले.
(३) इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा, अन्नधान्य, कपडे, युद्धसामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले.
(४) दोन्ही महायुद्धांच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले.
भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते; परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धांत सहभागी व्हावे लागले.
shaalaa.com
महायुद्धे आणि भारत
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?