Advertisements
Advertisements
प्रश्न
दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण ______.
पर्याय
अमेरिकेने जपानशी तहनामा केला.
अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला.
जपानची अर्थव्यवस्था नष्ट झाली होती.
जपानच्या नागरिकांनी युद्धाला विरोध केला होता.
उत्तर
दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला.
स्पष्टीकरण:
जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली होती. १९४१ मध्ये जपानने पर्लहार्बरवर बॉम्बहल्ला केला आणि अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला. यामुळे अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. अशा रीतीने या युद्धाला व्यापक स्वरूप आले. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलीपाईन्स परत घेतले. जपान शरण येत नाही असे पाहून अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि पुढे नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला.