मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. फळे नाशवंत असतात. त्यांचा वापर वेळेत केला नाही तर ती खराब होतात. यासाठी त्यांची साठवणूक आणि दीर्घकालीन वापर करण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते.
  2. वर्षभर वापरण्यासाठी वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवाबंद करणे अशा विविध प्रक्रिया वापरल्या जातात. शीतगृह वापरून देखील फळे टिकवली जातात. जॅम, जेली, सॉस, मुरांबे, छंद, लोणी, सरबते अशा फळ प्रक्रिया केलेल्या पदार्थांना खूप मागणी असते.
  3. अशा प्रक्रिया केलेल्या फळांचा वापर तर करतातच पण त्यापासून आर्थिक लाभ देखील होतो.
  4. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय फळांना खूप मागणी असते. त्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळू शकते. हापूस आंबा या फळाला असलेली मागणी पूर्ण केल्यावर स्थानिक बागायतदारांना खूप आर्थिक लाभ होतो.
  5. शिवाय जीवनसत्त्वयुक्त फळे आणि फळांपासून बनवलेल्या उत्पादनांमुळे शारीरिक स्वास्थ्य वाढते.
  6. अशा रितीने फलप्रक्रिया उदयोगाचे मानवी जीवनातील महत्त्व आहे.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - फळप्रक्रिया उद्योग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १००]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 5. ई. | पृष्ठ १००

संबंधित प्रश्‍न

वेगळा घटक ओळखा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×