Advertisements
Advertisements
प्रश्न
लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.
टीपा लिहा
उत्तर
- लसीकरण म्हणजे लस देणे. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळावी म्हणून ही लस देण्यात येते.
- पूर्वीच्या काळी रोगजंतूंचा वापर करूनच लस तयार केली जात असे. ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जाई. परंतु यातून काही जणांना त्या आजाराची लागण होण्याची शक्यता असे.
- हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या लसी तयार केल्या. त्यांनी रोगजंतूचे जे प्रथिन प्रतिजन (Antigen) म्हणून काम करते, त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले.
- अशा प्रतिजनाचा वापर लस म्हणून केला, तर सुरक्षितरीत्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजे लसीकरण करणे होय.
- प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या आणि ताप स्थिर लसी देऊन, लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हेपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतात.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : _______
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
व्याख्या लिहा.
लस
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
व्याख्या लिहा.
जनुकीय उपचार
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.
सहसंबंध ओळखा:
इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके