Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
अल्पकाळ व दीर्घकाळ
उत्तर
अल्पकाळ | दीर्घकाळ | |
१. | एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ म्हणजे अल्पकाळ होय. | दीर्घकाळ हा काही वर्षांचा- साधारणपणे पाच वर्षांपर्यंत- असा कालावधी असतो. |
२. | अल्पकाळामध्ये उद्योगसंस्थांना श्रमासारख्या काही आदानांचे समायोजन करून वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात वाढवता येणे शक्य असते. | दीर्घकाळामध्ये उद्योगसंस्थांना भूमी, श्रम व भांडवल या उत्पादन घटकांचे समायोजन करून वस्तू व सेवांचा पुरवठा वाढवणे शक्य असते. |
३ | उत्पादन घटक आणि उत्पादन खर्च हे बर्याच अंशी स्थिर असतात. | उत्पादन घटक आणि उत्पादन खर्च हे बदलणे शक्य असते. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दीर्घकाळाच्या बाजाराची वैशिष्ट्ये
(अ) उत्पादन घटक आणि खर्च बदलू शकतात.
(ब) दीर्घकाळात उद्योगसंस्थांना सर्व प्रकारचे खर्च जुळवून घेणे शक्य होते.
(क) हा कालावधी पाच वर्षांपर्यंत असतो.
(ड) वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही.
पूर्ण स्पर्धा : मुक्त प्रवेश आणि निर्गमन :: ______ : प्रवेशावर निर्बंध
मक्तेदारी : मूल्यभेद :: ______ : वस्तुभेद
बाजाराचा असा प्रकार, की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत, तर काही वैशिष्ट्ये आढळतात.
विसंगत शब्द ओळखा.
स्थळानुसार बाजार:
खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा:
सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जेथे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूची देवाण-घेवाण करतात. पण अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जाते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते. स्पर्धेनुसारच्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे दोन प्रकार आहेत. पूर्ण स्पर्धा ही बाजाराची काल्यनिक संकल्पना आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अपूर्ण स्पर्धेचे अनेक प्रकार आढळून येतात. जसे मक्तेदारी, द्वयाधिकार, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. सद्यस्थितीत मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही प्रत्यक्ष व्यवहारात मोठ्या प्रमाणात आढळून येते. यामध्ये पूर्णस्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात. उत्पादन खर्च व विक्री खर्च यातील भिन्रता हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे प्रमुख लक्षण आहे. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. यामध्ये जाहिरात, फलक, खिडकी प्रदर्शन इत्यादी चा समावेश विक्री खर्चात येतो. |
- अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा.
- बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा.
- विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा.