मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी

फरक स्पष्ट करा

उत्तर

  पूर्ण स्पर्धा मक्तेदारी
१. पूर्ण स्पर्धा हे बाजाराचे असे स्वरूप आहे जेथे असंख्य विक्रेते एकजिनसी वस्तू समान किमतीला शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय असंख्य ग्राहकांना विकतात. मक्तेदारी बाजारात वस्तूचा पुरवठा एकाच विक्रेत्याच्या किंवा उत्पादकाच्या (म्हणजेच मक्तेदाराच्या) नियंत्रणाखाली असतो.
२. येथे असंख्य विक्रेते असतात. येथे फक्त एकच विक्रेता असतो.
३. एकजिनसी वस्तूची विक्री होते. वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो.
४. मुक्त प्रवेश व निर्गमन असते. प्रवेश व निर्गमनावर बंधने असतात.
५. वस्तूची किंमत बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यातील आंतरप्रक्रियेतून निश्चित होते. विक्रेते व ग्राहक किंमत स्वीकारणारे असतात. वस्तूची किंमत विक्रेता निश्चित करतो. तो किंमतकर्ता असतो आणि ग्राहक किंमत स्वीकारणारा असतो.
shaalaa.com
पूर्ण स्पर्धा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: बाजाराचे प्रकार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
पाठ 5 बाजाराचे प्रकार
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×