Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन.
फरक स्पष्ट करा
उत्तर
क्र. | अलैंगिक प्रजनन | लैंगिक प्रजनन |
i. | कायिक पेशींच्या सहाय्याने होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेस अलैंगिक प्रजनन म्हणतात. | दोन जननपेशींच्या सहभागाने होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेस लैंगिक प्रजनन म्हणतात. |
ii. | हे प्रजनन एका जनकापासून होते आणि यासाठी नरजनक व मादीजनक अशा दोन जनकांची आवश्यकता नसते. | लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक या दोन जनकांची उपस्थिती आवश्यक असते. |
iii. | हे प्रजनन केवळ सूत्री विभाजनाच्या साहाय्याने घडते. | हे प्रजनन सूत्री विभाजन आणि अर्थगुणसूत्री विभाजन या दोन्ही प्रक्रियांद्वारे होते. |
iv. | या प्रजननामुळे निर्माण होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकासारखाच तंतोतंत असतो. | या प्रजननामुळे तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. |
v. | बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी पद्धतींनी विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन होते. | सर्व सजीवांमध्ये लैंगिक प्रजनन युग्मकनिर्मिती आणि फलनाच्या प्रक्रियेद्वारे घडते. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?