Advertisements
Advertisements
प्रश्न
'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.
लघु उत्तर
उत्तर
लेखकांचे लोकांना सांगणे आहे की निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. त्याच्या सुंदर, लोभसवाण्या रूपामुळे आपले मन प्रफुल्लित होते. स्वच्छ होते. निसर्ग आनंदाने सौंदर्य उधळीत असतो. इतरांनीही त्याप्रमाणे जगावे असे सुचवत असतो. निसर्गाच्या या सहवासामुळे आपले मन आशादायी बनते. आपले मन आनंदी असले तर आपण सगळीकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागतो. अशा वेळी जे जे चांगले ते ते आपल्याला दिसू लागते. तिकडेच आपले मन झेपावते. आपल्या बुद्धीचा उपयोग आपण चांगले शोधण्यासाठी केला पाहिजे. फुलासारखे, फुलपाखरासारखे जगायला शिकले पाहिजे, असा संदेश लेखक आपल्याला देतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?