Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा:
संप्रदायवाद
स्पष्ट करा
उत्तर
- संप्रदायवाद म्हणजे धर्म आधारित राष्ट्रप्रेम होय. म्हणजेच, राष्ट्रापेक्षा धर्माप्रती आत्यंतिक निष्ठा बाळगणे.
- इतके धर्म जिथे एकत्र नांदतात असा भारत हा जगातील एकमेव देश आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध होतो हे खरे असले तरी, यामुळे आपण विभक्त होणार नाही ना याची काळजी घ्यावयास हवी.
- धार्मिक द्वेष हे भारताच्या राष्ट्रीय एकतेसमोरील गंभीर आव्हान आहे. भारताच्या इतिहासात धार्मिक भेदांमुळे होणाऱ्या संघर्षाची असंख्य उदाहरणे सापडतात.
- प्रत्येक धर्माच्या अनुयायांना केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो; ही समस्या वाढत्या वांशिक केंद्रीततेशी संबंधित आहे. धार्मिक मूलतत्त्ववादाच्या माध्यमातून एखाद्या धर्माच्या श्रद्धा इतरांवर लादल्या जातात. यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होते.
- राजकीय समीकरणांतून एखादा धर्म इतर धर्माच्या विरुद्ध असल्याचे चित्र निर्माण केले जाते. यामुळेसांप्रदायिक दंगली, परस्परांबाबत अविश्वास आणिविघटनाची परिस्थिती निर्माण होते.
- देशातील सांप्रदायिकहिंसा आणि फुट पाडणाऱ्या शक्तींच्या वाढीसाठी इतरकारणांसह मोठ्या प्रमाणत निरक्षरता आणिअंधश्रद्धादेखील जबाबदार आहेत.
-
कोणताही संघर्ष असो, त्याचा राष्ट्रावर होणारा परिणाम अत्यंत खोल आणि दूरगामी असतो. हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल:
-
सामाजिक परिणाम: सांप्रदायिक संघर्षामुळे समाजात तीव्र शत्रुत्व निर्माण होते, विविध धार्मिक समुदायातील सदस्यांमध्ये कटुताआणि द्वेष निर्माण होतो.
-
आर्थिक परिणाम: आर्थिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, सांप्रदायिक संघर्षामुळे आर्थिक वृद्धी आणि विकासाची गती मंदावते. सांप्रदायिक संघर्षामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संसाधने वळवावी लागतात.
-
राजकीय परिणाम: धार्मिक संघर्ष लोकशाहीला कमकुवत करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशा संघर्षांमुळे भारताची प्रतिमा नकारात्मक प्रभावित होते.
-
-
थोडक्यात, सांप्रदायिक संघ हा एक अप्रिय घटक आहे जो राष्ट्राच्या ऐक्याला गंभीरपणे हानी पोहोचवतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?