Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
अवधान कक्षा
उत्तर
आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दिपकांची आपल्याला ज्ञानेद्रीयांमार्फत सतत जाणीव होत असते. परंतू सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपले एकाच वेळी लक्ष जात नाही. आपण काही उद्दीपकांची निवड करतो व त्यामुळे त्याच उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते. म्हणूनच अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अवधानासंदर्भात विविध व्याख्या दिल्या आहेत.
गिलफोर्डच्या मते- “जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ति व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय.”
अवधान कक्षा म्हणजे, व्यक्ती एकाच दृष्टीक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते, ती संख्या होय. आपली अवधान कक्षा अत्यंत मर्यादित आहे. सामान्य व्यक्तीची अवधान कक्षा ७ ते ८ अंकांपर्यंत किंवा अक्षरापर्यंत मर्यादित असते. म्हणूनच पोष्टाचेपिनकोड किंवा दूरध्वनी क्रमांक कधीही ७ ते ८ अंक या मर्यादेपेक्षा अधिक मोठे नसतात. वय, बुद्धिमत्ता, सराव, अनुभव इत्यादी घटकांचा अवधान कक्षेवर परिणाम होतो. उदा., सरावामुळे टेलिफोन ऑपरेटर किंवा टंकलेखक यांची अवधान विस्तार कक्षा सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक असू शकते.