Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे
थोडक्यात उत्तर
उत्तर
- ताणाशी समायोजन: भावनिक सुदृढ व्यक्ती ताणाच्यापरिस्थितीला चांगल्या प्रकारेहाताळतात. ते आरोग्यदायी जीवनशैली अवलंबतात. जसेमित्रांशी चर्चा, व्यायाम इत्यादी.
- उच्च स्व नियमन: या व्यक्ती चिंता, राग, भीती या भावनांना आपल्यावर वरचढ होऊ देत नाही. आपल्या भावनांना व्यवस्थित हाताळतात. आपल्या भावनिक स्थितीची त्यांना जाणीव असते. या नकारात्मक भावना जीवनाचा एक भाग आहे असेते मानतात.
- कार्यक्षमता विकास: सकारात्मक भावना त्यांच्यात ऊर्जाव उत्साह निर्माण करतात. याचा फायदा त्यांना अभ्यासासाठी व विविध कामांमध्ये कार्यक्षमता उंचावण्यासाठी होतो. त्यांच्यामध्ये ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची व स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता असते.
- नवनिर्मितीक्षमता (सर्जनशीलता) विकास: जीवनाविषयी जिज्ञासा व नवनवीन ज्ञान, अनुभव प्राप्त करण्याची लालसा असते. समस्या सोडविण्याचा एक मार्ग अपयशी ठरला तरी इतर मार्गशोधतात.
- जीवनाविषयी समाधानी वृत्ती: भावनिक सुदृढ व्यक्ती इतरांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण करू शकतात. समाजासाठी स्वयंसेवेसारख्या कार्यातून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतात.
shaalaa.com
भावनिक सुदृढता (सुस्थिती) - भावनिक सुदृढतेचे फायदे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?