Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
व्यसनासक्ती
उत्तर
व्यसनासक्ती म्हणजे अफू, चरस, गांजा, मद्य, हेराइन, कोकेन इ. अमलीपदार्थ सेवनाची सुरुवात केल्यानंतर व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. शेवटी ती व्यक्ती त्याच्यापुर्णपणे आहारी जाते. व्यक्तीचे मादक पदार्थ सेवनाचे प्रमाण इतके वाढते की, व्यक्ती त्याच्या शिवाय राहूच शकत नाही. या अवस्थेस अंमली पदार्थ व्यसनासक्ती (मादक व्यसनाधीनता) असे म्हणतात.
या व्यक्ती आपले व्यसन पुर्ण करण्यासाठी चोऱ्या करणे, भिक मागणे, उसनवारी करणे इतकेच नाही तर एखाद्याचा खुनही करण्यास मागेपुढे पहात नाहीत. मादक अंमली पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे शारीरिक परावलबीत्व निर्माण होते आणि जर अमली पदार्थाचे सेवन अचानक बंद करण्यात आले तर अपवेशक /माघार लक्षणे निर्माण होतात. ते अत्यत वेदनादायक असतात.
लक्षणे -
प्रमाणापेक्षा जास्त मादक पदार्थकिंवा मद्य सेवन करणे, दिवसभर नशेत रहाणे,मद्य पिण्याची सतत ईच्छा होणे, मित्राबरोबरचे आयुष्य मद्यामुळे संपणे, शारीरिक आजार असूनही मद्यपान चालू ठेवणे, नशा येण्यासाठी मद्याचे प्रमाण वाढवणे, मद्य सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे. इ व्यसनाधिनतेची लक्षणे आहेत.