Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कृती सोडवा.
लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासि अंकुशाचा मार।
(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी - ______ ______
(२) वरील उदाहरणातील अलंकार - ______
(३) या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______
उत्तर
(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी - मुंगी, ऐरावत नावाचा हत्ती
(2) वरील उदाहरणातील अलंकार - दृष्टान्त
(3) दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये -
- नम्रता या गुणाची महती सांगितली आहे.
- एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
सागरासारखा गंभीर सागरच!
खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?
खालील तक्ता पूर्ण करा.
अलंकाराची वैशिष्ट्ये |
अलंकाराचे नाव |
(अ) उपमेयाचा निषेध केला जातो. |
(१) __________ |
(अ) __________________ (आ) __________________ |
(२) अनन्वय अलंकार |
(अ) विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. |
(३) __________ |
(अ) ________________________ |
(४) अतिशयोक्ती अलंकार |
खालील कृती करा.
न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-
उपमेय ______
उपमान ______
दुसऱ्या ओळीतील
उपमेय ______
उपमान ______
खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.
कृती पूर्ण करा.
कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - ______
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______
खालील कृती सोडवा.
आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________
(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______
खालील ओळीतील अलंकार ओळखा:
आभाळागत माया तुझी आम्हांवरी रहू दे।
पुढील तक्ता पूर्ण करा.
उदाहरण | सामान्य सिद्धांत | विशेष गोष्टी |
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील। न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।। |
- | - |
पुढील तक्ता पूर्ण करा.
उदाहरण | सामान्य सिद्धांत | विशेष गोष्टी |
जो अंबरी उफळतां खुर लागलाहे। तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।। |
- | - |
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।
या वाक्यातील उपमेय ओळखा.
खालील ओळींमध्ये कोणत्या अक्षरांचे यमक आढळते?
हिंडू ओढे, धुंडू ओहळ
झाडावरचे काढू मोहळ
खालील ओळीत कोणत्या ध्वनींची पुनरावृत्ती झालेली आहे?
‘‘हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसी का शिरीं?’’
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’