Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.
पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा.
- सुख (आनंद)
- दुःख
- राग
- भीती
दीर्घउत्तर
उत्तर
भावनेची अशी व्याख्या केली जाते की भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार, या सर्वांचे एकत्रित संयोजन होय. पॉल अर्कमन यांनी ६ प्रकारच्या प्राथमिक भावना सूचविल्या आहेत.
- सुख (आनंद): रियाच्या उदाहरणामध्ये तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला वाढदिवसाची पार्टी अचानक देऊन चकित केल्यामुळेतिला सुख किंवा आनंदाचा अनुभव येईल. सुख ही एक सकारात्मक भावना असून त्याचा अनुभव आपल्या सर्वांनाच येतो. सुखाची भावना, तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडलेली आहे. आपली मानसिक खुशाली, आरोग्य आणि दीर्घायुष्य याच्याशी तिचा जवळचा संबंध आहे.
- दुःख: आपल्या मैत्रिणींशी संबंध तुटल्यामुळे रोहनला दुःखाचा अनुभव येईल. निराशा, दुःख आणि नैराश्य ही दुःख भावनेची वैशिष्ट्ये आहेत. सुखाप्रमाणेच दुःखाचाही आपल्याला अनेक वेळा अनुभव येतो. दुःख वाटणेहे सर्वसामान्य आणि नैसर्गिक असलेतरी दीर्घकालीन दुःख निराशेमध्ये रूपांतरीत होऊ शकते. अर्थातच, दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्ग आहेत. त्याने भावनिकदृष्ट्या स्थिर होण्यास मदत होते.
- राग: मित्राशी मतभेद झाल्याने समीर रागाचा अनुभव घेईल. राग ही अशी (तीव्र) शक्तिशाली भावना आहे की ज्यामध्ये शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश होतो. चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्तर, आक्रमक वागणूक यातून राग व्यक्त होतो. राग दुधारी तलवारीप्रमाणे आहे.
- भीती: सुमी पालकांना आपण परीक्षेत नापास झाल्याचे सांगण्याच्या कल्पनेने भयभीत असल्याने तिला भीतीचा अनुभव येईल. उत्क्रांतीचा विचार करता जगण्याच्या दृष्टीने भीती ही भावना देखील एक तीव्र शक्तीशाली भावना आहे. भीतीमधून धोका व्यक्त होत असल्यानेही भावना ‘लढा किंवा पळा’ याच्याशी जोडलेली आहे.
shaalaa.com
मूलभूत भावना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?