Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.
संवेदनाची संघटन तत्त्वे आकृतीसह स्पष्ट करा:
- समीपतेचे तत्त्व
- समानतेचे तत्त्व
- सातत्यतेचे तत्त्व
- समावेशन तत्त्व
दीर्घउत्तर
उत्तर
संवेदनाशी संबधीत तथ्ये: बाह्य वातावरणातून प्राप्त झालेल्या माहितीला पूर्वानुभवाद्वारे अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजे संवेदन होय. जाणीवांना संघटीत करून त्यांकडे अर्थपूर्ण संपूर्ण स्वरुपात पाहण्याची मेंदूत क्षमता असते.
- समीपतेचे तत्त्व: संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक एकमेकांच्या समीप असतात, त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक एकमेकांपासून दूर असतात, त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही.
या आकृतीत आपणांस ठिपक्यांच्या जोड्यांच्या ओळी असे प्रत्येक ओळीचे संवेदन होते. त्यामुळेच सर्वसाधारणपणे ८ ठिपक्यांची ओळ असे संवेदन न होता, ठिपक्यांच्या ४ जोड्यांची ओळ असे संवेदन होते. - समानतेचे तत्त्व: संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक समान स्वरूपाचे असतात, त्यांचे एकत्रितपणे संवेदन होतेव जे उद्दीपक समान स्वरूपाचे नसतात, त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही.
या आकृतीत ठिपक्यांच्या उभ्या चार ओळी व फुल्यांच्या चार उभ्या ओळी असे संवेदन होते. सर्वसाधारणपणे ठिपका, फुली, ठिपका, फुली याप्रमाणे आडव्या चार ओळींचे संवेदन होत नाही. - सातत्यतेचे तत्त्व: संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दिपकाचे विशिष्ट दिशेत सातत्यपूर्ण संवेदन होते. या तत्वानुसार जरी दोन उद्दीपक एकमेकांना छेदून जात असले तरी त्यांचे तुटकपणे संवेदन न होता त्यांत सातत्य दिसून येते.
या आकृतीत सरळ उभ्या व सरळ आडव्या रेषेचे इंग्रजीतील L या मुळाक्षराच्या स्वरूपात संवेदन होते व L ला छेदून जाणाऱ्या तिरक्या रेषेचे स्वतंत्रपणे एक सलग तिरकी रेघ म्हणून संवेदन होते. सर्वसाधारणपणे, आपणांस येथे भिन्न दिशेत जाणाऱ्या चार स्वतंत्र रेषा असे संवेदन होत नाही. - समावेशन तत्व: संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दिपकाचे स्वरूप अपूर्ण असेल, तर त्याचे संवेदन होताना, त्या अपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रुपात मेंदूद्वारे पहिले जाते. आपल्या मेंदूद्वारे उद्दिपकातील अपूर्ण जागा भरल्या जातात व अपूर्ण उद्दीपकाला अर्थपूर्ण आकृतीच्या स्वरूपात पाहिले जाते.
या आकृतीत आपण रिकाम्या जागा भरतो आणि आपणांस या आकृतीचे त्रिकोण व चौकोन असे संवेदन होते. सर्वसाधारणपणे, येथे आपणांस वेगवेगळ्या दिशांत जाणाऱ्या तीन किंवा चार स्वतंत्र रेषा या प्रमाणे संवेदन होत नाही.
shaalaa.com
संवेदनाशी संबधीत तथ्ये
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?