Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.
उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.
सुधारक -
उत्तर
सुधारक - सुधा, धार, कर, धाक, धारक, सुर
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अभ्यासाचे डोंगर पेलणे-
खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे − हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे − हे चिन्ह येईल.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
अ. क्र. | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
(१) | पुरुषांसाठी | ||||||
(२) | व | ||||||
(३) | स्त्रियांसाठी | ||||||
(४) | वेगवेगळे | ||||||
(५) | सामने | ||||||
(६) | होतात |
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
खावा -
वाचा. सांगा. लिहा.
नादमय शब्द
उदा., छुमछुम, झुकझुक.
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
खुदकन हसणे -
खालील शब्दाचे वचन बदला.
माणूस -
‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
गणू म्हणाला अग आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.
गाव | पूर | नगर | बाद |
मानगाव | सोलापूर | अहमदनगर | औरंगाबाद |
ओळखा पाहू!
केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,
- टेप आणा आपटे.
- तो कवी ईशाला शाई विकतो.
- ती होडी जाडी होती.
- हाच तो चहा.
- सर जाताना प्या ताजा रस.
- काका, वाचवा, काका.
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारियाने दार ______
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
(१) वरील उदाहरणातील उपमेय - ______
(२) वरील उदाहरणातील उपमान - ______
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
ऐकणे
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) हकालपट्टी करणे. | (अ) आश्चर्यचकित होणे. |
(२) स्तंभित होणे. | (आ) योग्य मार्गावर आणणे. |
(३) चूर होणे. | (इ) हाकलून देणे. |
(४) वठणीवर आणणे. | (ई) मग्न होणे. |
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.