Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे − हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे − हे चिन्ह येईल.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
अ. क्र. | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
(१) | पुरुषांसाठी | ||||||
(२) | व | ||||||
(३) | स्त्रियांसाठी | ||||||
(४) | वेगवेगळे | ||||||
(५) | सामने | ||||||
(६) | होतात |
उत्तर
अ. क्र. | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
(१) | पुरुषांसाठी | पुरुष | नाम | सामान्यनाम | पुल्लिंग | अनेकवचन | चतुर्थी |
(२) | व | व | उभयान्वयी अव्यय | समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय | − | − | − |
(३) | स्त्रियांसाठी | स्त्री | नाम | सामान्यनाम | स्त्रीलिंग | अनेकवचन | चतुर्थी |
(४) | वेगवेगळे | वेगवेगळा | विशेषण | संख्याविशेषण | − | अनेकवचन | − |
(५) | सामने | सामना | नाम | सामान्यनाम | पुल्लिंग | अनेकवचन | प्रथमा |
(६) | होतात | होणे | क्रियापद | अकर्मक क्रियापद | − | − | − |
संबंधित प्रश्न
केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.
(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)
विरामचिन्हे - |
नावे |
; |
|
....... |
|
– |
|
: |
|
- |
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अभ्यासाचे डोंगर पेलणे-
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
भेटवस्तू - ______
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
चुकीची शिस्त-
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
प्रत्येक दारी-
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
खालील वाक्यातील काळ ओळखा.
काल शब्द शिकून घेतले.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
त्याचा फोटो छान येतो.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
आज ______ खूप मजा केली.
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
मार्गदर्शन -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
बिजागरी -
पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.
गाव | पूर | नगर | बाद |
मानगाव | सोलापूर | अहमदनगर | औरंगाबाद |
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
ऑपरेशन -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
किनारा -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
शेवट -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
नातेवाईक -
खालील शब्दाचे लिंग बदला.
वाघ -
खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.
...... - वाट.
विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे |
खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
नोंदी करणे -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
आमूलाग्र -
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
______! केवढा मोठा अजगर!
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
खालील वाक्यात योग्य नाम लिहा.
______ हा माझा जिवलग मित्र आहे.
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
थांबणे ×
खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.
वाक्ये | लिंग | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | |||
(अ) कावळा झाडावर राहतो. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(आ) रेश्माने पत्र वाचले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(इ) पोस्टमनने पत्र दिले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(ई) मायाने पाकीट उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(उ) मायाने दार उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
लहान × ______
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
प्रत्येक घरी | ______ |
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
सुपीक ×
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्वदेशी ×
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)
(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
______ आणि ______
(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______
(आ) संतांचा विशेष गुण - ______
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
परिपूर्ण - ______
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
कृतज्ञ-कृतघ्न
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.