Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
उत्तर
वडील म्हणाले, “ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का?”
विरामचिन्हे | नावे |
“ ” | दुहेरी अवतरण चिन्ह |
, | स्वल्पविराम |
? | प्रश्नचिन्ह |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-
खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.
खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय | स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय | रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय | परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय |
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
घरामंदी -
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
आज ______ खूप मजा केली.
खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.
मी ______ पाणी प्यायलो.
खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.
शब्द | लिंग | वचन |
उदा., घर | नपुंसकलिंगी | घरे |
भिंत | स्त्रीलिंगी | भिंती |
चेहरा | पुल्लिंगी | चेहरे |
निवारा | ||
आई | ||
डोंगर | ||
हवा | ||
आजोबा |
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
अहाहा किती छान चित्र आहे
सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ______.
हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
घागर (समुद्र) - ......
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
जन्म × ______
खालील उदाहरणे वाचा व अभ्यासा.
- मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.
- आई गावाहून चार पाच दिवसांत परत येईल.
- दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरूण घ्यावे.
(१) अधोरेखित शब्दांत किती पदे आहेत?
(२) दोन्ही पदे महत्त्वाची वाटतात काय?
दोन्ही पदे महत्त्वाची - द्वंद्व समास वैशिष्ट्ये - समासाचा विग्रह आणि, व, अथवा, किंवा या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी नाहीतर वा, किंवा, अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी करतात.
(१) इतरेतर द्वंद्व | (२) वैकल्पिक द्वंद्व | (३) समाहार द्वंद्व |
दोन्ही पदे महत्त्वाची. विग्रह - आणि, व या समुच्च्यबोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा. |
दोन्ही पदे महत्त्वाची. विग्रह वा, किंवा, अथवा अशा विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा. |
दोन्ही पदे महत्त्वाची. दोन्ही पदांसोबत त्याच प्रकारच्या इतर पदांचा समावेश (समाहार) गृहीत धरलेला असतो. |
उदा., कृष्णार्जुन कृष्ण आणि अर्जुन |
उदा., खरेखोटे खरे किंवा खोटे |
उदा., भाजीपाला भाजी व इतर गोष्टी |
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
(१) वरील उदाहरणातील उपमेय - ______
(२) वरील उदाहरणातील उपमान - ______
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
राखणे
खालील वाक्य वाचून दिलेल्या ओळीत उत्तरे लिहा.
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
(१) प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट - ______
(२) अचेतन गोष्टीने केलेली कृती - ______
(३) अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? ______
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
कृतज्ञ-कृतघ्न