मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा. वर्तमान काळ हा संगणकीकरणाचा आहे. - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा.

वर्तमान काळ हा संगणकीकरणाचा आहे.

पर्याय

  • सत्य

  • असत्य

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

हे विधान सत्य आहे.

स्पष्टीकरण:

  1. वर्तमान काळ हा संगणकीकरण आणि अंकीकृत रूपांतराचा आहे. दोन्ही प्रक्रियांच्या आधारे घडून आलेल्या बदलांचे भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाले. हे बदल ज्ञानाची उपलब्धता, कृत्रिम बुद्धीचा विकास, ई-शासकीय व्यवस्था, ई-व्यापार, ई-शिक्षण, ईविपणन, ई-शॉपिंग इत्यादी क्षेत्रात दिसतात. ही यादी न संपणारी आहे.
  2. एका साध्या पद्धतीच्या आधारे केवळ एक कळ दाबली की उपभोक्त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात. अंकीकृतकरणामुळे नवीन माहिती मिळवणे, माहितीचे व्यवस्थापन करणे या गोष्टी सुलभ झाल्या हे खरे असले तरी त्यामधून अनेक आव्हानेही पुढे आली. त्यांमध्ये मोठ्या उद्योगांचा छोट्या उद्योगांवर झालेला विपरित परिणाम, विपणनक्षेत्रावर झालेला परिणाम, ग्राहकांची वर्तणूक, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी, उत्तरदायित्वाची वाढलेली जबाबदारी आणि त्याचे परिणाम, आभासी जगात व्यक्तिच्या खासगी जीवनाला निर्माण झालेला धोका अशा अनेक आव्हानांचा समावेश आहे.
shaalaa.com
समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावरील परिणाम
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×