मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: 

किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.

पर्याय

  • सहमत

  • असहमत

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

मी दिलेल्या विधानाशी असहमत आहे.

स्पष्टीकरण:

मक्तेदारीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. एकच विक्रेता: मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते. परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते.
  2. पर्यायी वस्तूंचा अभाव: मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला वाव नसतो. त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून वंचित राहावे लागते. मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक असते.
  3. प्रवेशावर निर्बंध: कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने येतात.
  4. बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण: मक्तेदाराचे बाजारपुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. तो वस्तूचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो.
  5. किंमतकर्ता: मक्तेदाराचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदारी उद्योगसंस्था स्वत:च्या मालाची/उत्पादनाची किमत निश्‍चित करते. त्यामुळे मक्तेदार हा किंमतकर्ता असतो.
  6. मूल्यभेद: मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे वेगवेगळ्या किंमती आकारू शकतो. अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना तिकीटात सवलत दिली जाते. 
  7. उद्योगसंस्था हाच उद्योग: मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारीत उद्योगसंस्था हाच उद्योग असतो.
shaalaa.com
मक्तेदारी स्पर्धा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×